कणकवलीच्या भरणी गावात अखेर मोबाईलची रिंग वाजणार

*बीएसएनएल ५ जी टॉवरचे भूमिपूजन !

कणकवली – तालुक्यातील भरणी गावात ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक सदस्यांना तोंड द्यावे लागत होते. ग्रामस्थांना ३ किलोमीटर अंतरावर जाऊन मोबाईल नेटवर्कसाठी संपर्क साधावा लागत होता. मात्र अखेर या गावात मोबाईलची रिंग वाजणार आहे.या गावासाठी बीएसएनएल कंपनी ५ जी टॉवर उभारणार आहे.या टॉवरचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.

या गावातील ग्रामस्थांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे बीएसएनएल ५ जी टॉवरचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
ग्रामस्थांनी या टॉवरसाठी पाठपुरावा केल्यामुळे आता गावात बीएसएनएलची रेंज मिळणार आहे.कोणत्याही शासकीय कामासाठी आरोग्याच्या सेवेसाठी आणि इतर सर्वप्रकारे संपर्क करण्यासाठी भरणी गावातील प्रामस्थांना मोबाईल नेटवर्कसाठी ३ किमी अंतरावर जाऊन संपर्क करावा लागत होता. मात्र आता गावातील दानशूर ग्रामस्थ अण्णा परब यांनी या टॉवरसाठी स्वतःची जमीन मोफत स्वरुपात दिली आहे. या टॉवरच्या भूमिपूजनावेळी भरणी सरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत घाडी,
पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष मनिष पाताडे, भारतीय मजदूर संघ सिंधुदूर्ग उपाध्यक्ष अशोक घाडी आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या टॉवरसाठी गेली अनेक वर्षे
या सर्वानी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top