कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आयफेल टॉवर बंद!

पॅरिस –

जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण असलेला पॅरिसमधील आयफेल टॉवर बुधवारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद ठेवण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढवली. व्यवस्थापनावर गैरनियोजनाचा आरोप करत हे कर्मचारी काल संपावर गेले. त्यांनी कालचाच दिवस निवडावा यामागेही विशेष कारण आहे. आयफेल टॉवरचे ज्यांच्या संकल्पनेतून साकारले ते इंजिनीअर गुस्ताव्ह आयफेल यांच्या पुण्यतिथीचे काल शतक महोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्ताने हा संप पुकारण्यात आला होता.
टॉवरचे काम पाहणाऱ्या कंपनीने गैरव्यवस्थापनाचा कळस गाठला आहे. कंपनीने समोर आणलेले बिझनेस मॉडेल अशाश्वत आहे, असा जनरल कॉन्फेडरेशन ऑफ लेबर या कामगार संघटनेचा दावा आहे. दरम्यान, ज्यांनी कालची तिकीटे काढली त्यांना पुढील बुकींग देण्यात येणार आहे. आयफेल टॉवरला दरवर्षी सुमारे ७० लाख पर्यटक भेट देतात. परदेशी पर्यंटकांची संख्या जास्त असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top