कारखान्याची धुरांडी थंडावल्याने ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर – शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नामुळे साखर कारखान्यांची पेटलेली धुरांडी पुन्हा थंडावली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ऊसतोडणी मजूर संकटात सापडले आहेत.सरकारने ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी आंदोलनकर्ते व साखर कारखानदारांची समन्वय बैठक घडवून मार्ग काढण्याची गरज आहे.ऊसतोडणी बंद असल्याने कारखान्याची धुरांडी कधी पेटणार, याकडे या मजुरांचे लक्ष लागले आहे.
या दोन्ही तालुक्यांतील पाच साखर कारखाने आंदोलनामुळे बंद आहेत. त्यामुळे वाहनमालकांनी सोलापूर,बीड जिल्ह्यातून आणलेले ऊसतोड मजूर हवालदिल झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून हे मजुर रिकामे बसून आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.हातकणंगले तालुक्यातील आळते परिसरात या मजुरांनी आपल्या राहूट्या उभारल्या आहेत.वाहनधारकांना मात्र काम नसले तरी जोडीमागे २०० रुपये द्यावे लागत आहेत.अशाप्रकारे या ऊसदर आंदोलनाचा फटका ऊसमालकाबरोबर वाहनधारक आणि ऊसतोड मजुरांनाही बसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top