कारली, हिरवी मिरची कांद्याचे भाव तेजीत

चाकण :-
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बटाटा व लसणाची भरपूर आवक झाली. कारली, हिरवी मिरची व कांद्याचे भाव तेजीत राहिले. चाकण बाजारात गेल्या सहा महिन्यात प्रथमच जळगाव भुईमुग शेंगाची आवक झाली. लसणाची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व फरशीची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक झाली. तर मेथी व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई व शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी, ३० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने वाढून भावात २०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ४,००० रुपयांवरुन ४,२०० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने वाढून भावात ३०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून २,००० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगांची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, या शेंगांना ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १५ हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक १३५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २६५ क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top