काश्मीरातील तहरीक-ए-हुर्रियतसंघटनेवर केंद्र सरकारची बंदी

श्रीनगर – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरु असताना आज केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेपाठोपाठ(मसरत आलम ग्रुप) तहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली.

अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रतिबंधीत कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देऊन भारतविरोधी प्रचार करत होती. नरेंद्र मोदी यांचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण आखले आहेे. त्यामुळे अनलॉफुल एक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन एक्ट अंतर्गत या संघटनेवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top