खासगी बस १०० फूट दरीत कोसळली! २८ जण जखमी

बुलढाणा

इंदूर येथील रॉयल ट्रॅव्हलच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला. ही बस इंदूरहून अकोल्याकडे जाताना बुलढाण्यामधील जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात १०० फूट बस दरीत कोसळली. ही घटना आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. यात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदतकार्य उशिरा सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top