गर्डर उभारणीसाठी पश्चिम रेल्वेवर २० दिवसांसाठी रात्रकालीन ब्लॉक

मुंबई

अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी तब्बल २० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून पुढील २० दिवस हा ब्लॉक घेण्यात येईल.

या कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. साधारण चार ते पाच तासांचा हा ब्लॉक असल्याने प्रवाशांचा त्रास वाढणार आहे. या ब्लॉकचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वेकडून गोखले पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी तब्बल ९० मीटर लांबीचा गर्डर उभारण्यात येणार आहे. या गर्डरचे सुटे भाग एकत्र करून त्यांची जोडणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या गर्डरचे वजन सुमारे १३०० टन एवढे आहे. यासाठी खास क्रेन मागवण्यात आली असून त्यांच्या साह्याने हा गर्डर बसवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top