गुजरातमध्ये कारला अपघात दहा जण जागीच ठार

अहमदाबाद
गुजरातमधील अहमदाबाद बडोदा एक्सप्रेसवेवर आज झालेल्या भीषण अपघातात १० जण जागीच ठार झाले. बडोद्याहून अहमदाबादला येणारी एक कार खेडा जिल्ह्यातील नाडियाड जवळ टँकरला मागून धडकल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की या कारमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमी प्रवाशांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग च्या पथकाने तातडीने मदत कार्य सुरु केले. यावेळी एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली. पोलिस या अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top