गुजरातमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के

गांधीनगर

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज सकाळी ८:०६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १५ किलोमीटर खोलीवर होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, अनेक ठिकाणी लोक त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसांत गुजरातमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी २८ जानेवारी रोजी कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील भचाऊजवळ होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top