चिखलीत दाट लोकवस्तीत बिबट्या आल्याने घबराट

पिंपरी – चिखली येथे दाट लोकवस्तीमध्ये गुरुवारी सकाळी बिबट्या आढळल्याने एकच घबराट उडाली. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असल्याचे निरीक्षण वनविभागाकडून नोंदवण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी दोन तास बिबट्याचा पाठलाग करीत होते. अखेर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

चिखली येथे गुरुवारी पहाटे बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. रस्त्यावर, घरासमोर, गोठ्यात आणि नंतर शेतात असा त्याने सर्वत्र वावर केला. सकाळी सव्वा सहा वाजता वन विभागाला चिखली येथे बिबट्या आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हवेली वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी आणि बावधन येथील रेस्क्यू टीम चिखली येथे दाखल झाली. सुदाम मोरे यांच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या ज्वारीच्या शेतात पाठलाग करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले. त्याला बावधन येथील वनविभागाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर पुढील काही दिवस देखरेखीखाली ठेवले जाईल. त्याच्या हालचाली आणि प्रकृतीची खात्री करून त्याला मोठ्या जंगलात सोडले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top