जानेवारीत कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : जानेवारी महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सीएसआर एक्सलन्स पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पुढच्या महिन्यात मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. कोस्टल रोड सुरु झाल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.

महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, सगळ्यात जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट आजच्या काळात महाराष्ट्रात आहेत. पूर्वीच्या काळात सगळं बंद करण्यात आलं होतं, आमचं सरकार आल्यावर सगळे प्रकल्प सुरू झाले. कोस्टल हायवे जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरु होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान सुरु होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी पुढील टप्पा सुरु होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top