टेस्ला गुजरातमध्ये उभारणार भारतातील पहिला कारखाना

गांधीनगर- अमेरिकेतील टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी एक वर्षांपूर्वी भारतात जास्त आयात शुल्क असल्यामुळे या देशात गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान मस्क यांनी भारतात गुंतवणुकीचे संकेत दिले आहेत.इलॉन मस्क यांनी आपला पूर्वीचा निर्णय बदलला असून त्यांनी गुजरातमध्ये आपला भारतातील पहिला कारखाना उभारण्याचा निर्णय पक्का केला आहे.

अलीकडेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही अमेरिकेतील टेस्ला प्लांटला भेट दिली होती.इलॉन मस्क हे गुजरातमध्ये भारतातील पहिला प्लांट उभारणार असून त्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती गुजरातचे प्रवक्ते आणि राज्याचे आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांनी दिली आहे.टेस्ला कंपनी सुरुवातीला २ अब्ज डॉलर गुंतवण्याचा विचार करत आहे. जानेवारीमध्ये गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट आयोजित केले आहे.यावेळी एलॉन मस्क हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये टाटा मोटर्सनंतर गुजरात ऑटो मोबाईल हब म्हणून उदयास आले. राज्यात फोर्ड मोटर्स,टाटा मोटर्स आणि सुझुकी यांचे प्लांट आहेत.दरम्यान,राज्य सरकारने टेस्लाचे उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी साणंद, बेचराजी आणि धोलेरा ही ठिकाणे सुचवली आहेत.’ यापूर्वी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये टेस्लाचा प्लांट उभारण्याचा विचार होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top