डोनाल्ड ट्रम्प आयोवा कॉकसच्या पहिल्या निवडणुकीत विजयी

वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या रिपब्लिकन पक्षात झालेल्या आयोवा कॉकसच्या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. १५ जानेवारी रोजी आयोवा राज्यात रिपब्लिकन पक्षाची पहिली कॉकस निवडणुक आयोजित करण्यात आली होती. कॉकसच्या या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले आहेत. या विजयामुळे जो बायडन यांना पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

आयोवामध्ये १६०० हून अधिक ठिकाणी मतदान झाले, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी घोषित करण्यात आले. यामुळे रिपब्लिकन पक्षाचे मतदार अजूनही ट्रम्प यांना जोरदार पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली किंवा फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस हे दुसऱ्या क्रमांकावर असतील. आयोवा नंतर, न्यू हॅम्पशायर, नेवाडा आणि दक्षिण कॅरोलिना येथे देखील कॉकस निवडणुका होणार आहेत. आयोवा राज्यात प्रथम कॉकस असल्याने, सर्वांच्या नजरा आयोवाकडे होत्या. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ उमेदवार आहेत. गेल्या १ वर्षांपासून ते या शर्यतीत आघाडीवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सध्या अमेरिकेच्या कोर्टात खटले सुरु आहेत. कायदेशीर लढाईमुळे त्यांची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा सुरु होत्या. मात्र आयोवाच्या विजयामुळे ट्रम्प यांना अजूनही त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा असल्याचे जाहिर झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top