तैवानमध्ये भूकंपाचे धक्के महिनाभरात १,००० हादरे

तैपीई –
तैवानमध्ये आज पूर्वेकडील काउंटी हुआलियनजवळ भूकंपाचे धक्के जाणवले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी होती.

आज सकाळी हुलालियन भागाला भूकंपाचा धक्का बसला. तैवानची राजधानी तैपेईमध्येही इमारती हादरताना दिसल्या. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून २४.९ किलोमीटर खोलवर होता. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला हुआलियनमध्ये ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तैवानमध्ये १,००० हून अधिक धक्के बसले आहेत. आजही येथे ३० मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के जाणवले. यापैकी एकाची तीव्रता ६.१ आणि दुसऱ्याची तीव्रता ५.८ होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top