त्र्यंबकेश्वरात गोदावरी जन्मोत्सव! दहा महिलांची प्रवचने होणार

त्र्यंबकेश्वर- गंगा गोदावरीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारपासून दशहरा अर्थात गोदावरी जन्मोत्सव सोहळा सुरू झाला आहे. या सोहळ्याची सांगता २२ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने होणार आहे.
या सोहळ्यात यंदा दहा दिवस दररोज महिलांचे प्रवचन होणार आहे.धार्मिक क्षेत्रातील नामांकित महिला ही प्रवचन सेवा बजावणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी हभप श्रध्दा शुक्ल यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन होईल.माध्यान्ही गोदावरी मातेचा जन्मोत्सव होईल. सायंकाळी ग्रामस्थांच्यावतीने कुशावर्त तीर्थावर दीपोत्सव होईल.तर २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी गोदावरी मातेचा पालखी सोहळा पार पडणार आहे.त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रक्षालन पूजा आणि दुपारी थेटे मंगल कार्यालयात महाप्रसाद वाटप कार्यक्रम होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top