दिवा-मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून आयटी तज्ज्ञाचा मृत्यू

मुंबई- मुंबई सेंट्रल येथील कंपनीत कामावर चाललेल्या डोंबिवलीतील एका तरुण आयटी तज्ज्ञाचा जलद लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना दिवा-मुंब्रा दरम्यान घडली.अवधेश राजेश दुबे (२५) असे या मृत आयटी तज्ज्ञाचे नाव आहे.
अवधेश हा मुंबई सेंट्रल येथील मनोरमा इन्फोसोल्यूशन्स कंपनीत काम करत होता. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याने डोंबिवली येथून जलद ट्रेन पकडली.ही ट्रेन दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आली असता अवधेश हा अचानक ट्रेनमधून खाली पडला. रेल्वे पोलिसांनी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अवधेश हा डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरात राहत होता. त्याने आयआयटी पाटणा येथून माहिती तंत्रज्ञानमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top