दुचाकींची जोरदार धडक दोघांचा मृत्यू! २ जखमी

हिंगोली

हिंगोलीमधील हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर पाटी जवळ आज दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास नागपूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्यातील राहेरी गावाजवळ देखील एका ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक रिकाम्या काचेच्या बाटल्या घेऊन जात होता. हरी ओम शर्मा असे मृत चालकाचे नाव असून तो मध्य प्रदेशमधील लटेरी गावातील रहिवासी होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top