देवगडच्या हिंदळे गावामध्ये कार्तिक स्वामी दर्शन सोहळा

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात देवगड तालुक्यातील हिंदळे गावातील श्री कार्तिक स्वामी दर्शन यात्रा रविवार २६ नोव्हेंबर आणि सोमवार २६ नोव्हेंबर अशी दोन दिवस होणार आहे.तरी भाविकांनी कार्तिक स्वामी मूर्ती दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या रविवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५४ वाजल्यापासून सोमवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ वाजेपर्यंत पौर्णिमा व कृतिका नक्षत्र एकत्र आहे.
या योगावर कार्तिक स्वामी दर्शन यात्रा होणार आहे.
कार्तिक स्वामींचे वाहन हे मयूर म्हणजेच मोर आहे. यादिवशी श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन दर्भ,
चंदन,फुले,दशांगधूप आणि दीप अर्पण केला जातो. यावेळी श्री कार्तिकेय स्रोताचे पठण केले जाते. त्यामुळे मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक शक्ति वाढते. तरी भाविकांनी या दोन दिवशी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top