न्यू जर्सीत इमामाची गोळ्या झाडून हत्या

न्यू जर्सी – न्यू जर्सीमधील मस्जिद मुहम्मद मशिदीबाहेर इमाम हसन शरीफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना काल नेवार्कमधील मुहम्मद मशिदीबाहेर घडली. हसन शरीफ यांची हत्या केल्यानंतर मारेकरी फरार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनस्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, नेवार्कचे महापौर, रास जे. बराका यांनी म्हटले की, ”गुन्हेगाराला शोधायला कितीही वेळ लागला तरीही पोलीस अधिकारी शरीफ यांना न्याय मिळवून देतील. शरीफ या शहरातील लोकांसोबत होते आणि आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत.” न्यू जर्सीचे ऍटर्नी जनरल, मॅथ्यू प्लॅटकिन यांनी काल दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ”गोळीबार पूर्वनियोजित होता असे कोणतेही संकेत नाहीत, परंतु या घटनेमुळे न्यू जर्सीच्या मुस्लिमांमध्ये चिंता आणि भीतीची भावना निर्माण झाली आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top