बीड
बीडच्या अंबाजोगाईमध्ये ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोदींच्या या सभेची तयारी करत आहेत. या दिवशीच अहमदनगरमध्येदेखील सुजय विखे-पाटील यांच्यासाठी मोदींची सभा होणार आहे. दुपारी ४.३० वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.