पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये सभा

नंदुरबार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नंदुरबारमध्ये सभा घेणार आहेत. नंदुरबार लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दोंडाईचा रस्त्यावरील चौपाळे शिवारात स्वामी समर्थ केंद्र परिसरातील मैदानात ही सभा होणार आहे. महाविकास आघाडीने हीना गावित यांच्याविरोधात गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. या सभेसाठी एक ते दीड लाख लोक या सभेला येतील, असा विश्वास भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सभेनिमित्त नंदुरबार ते दोंडाईचा या मार्गासह शहराकडे येणाऱ्या काही मार्गांवरील वाहतुकीच्या मार्गात सभेच्या काळापर्यंत बदल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top