पंतप्रधान मोदी पोंगल सणानिमित्त मंत्री एल. मुरुगन यांच्या घरी गेले

चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोंगल सण साजरा करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या घरी गेले होते. आज सकाळी १० वाजता मुरुगन यांच्या शासकीय निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोदींसह तेलंगणाच्या राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या. या प्रसंगी मोदींनी ‘पोंगल सण महान भारताची भावना आहे’,असे मत व्यक्त केले.
गेल्या वर्षी तामिळ नववर्ष पुथांडू साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एप्रिलमध्ये मुरुगन यांच्या घरी भेट दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विशेषत: दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. मोदींनी त्यांच्या नव वर्षातील दौऱ्याची सुरुवात तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळमधून केली. २ आणि ३ जानेवारीला त्यांनी हा दौरा केला. २ जानेवारी रोजी ते तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पोहोचले, जिथे त्यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाग घेतला. यानंतर पंतप्रधान मोदींनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये जाहीर सभेला संबोधित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top