पार्किंगच्या वादावरून अंगावर कुत्रा सोडला

नवी मुंबई- नवी मुंबईतील नेरूळ परिसरात पार्किंगच्या वादातून मोठे भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. विठ्ठल राक्षे आणि मंगेश मुळगावकर हे दोघे एकाच सेक्टरमध्ये वेगवेगळ्या इमारतीमध्ये राहतात. विठ्ठल यांनी काही कामानिमित्त मंगेश यांच्या इमारतीच्या गेट समोर आपली कार उभी केली. यावेळी मंगेश यांनी विठ्ठल यांना जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला.

भांडताना मंगेश यांनी विठ्ठल यांना जबर मारहाण केली. यादरम्यान मंगेश यांनी चक्क आपला पाळीव कुत्रा विठ्ठल यांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने विठ्ठल यांच्या हाताला चावा घेऊन त्यांना जखमी केले. याप्रकरणी विठ्ठल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार मंगेश आणि त्यांचा मुलगा सौमिल मुळगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top