पुण्यात ३ मे रोजी राहुल गांधींची सभा

पुणे

पुण्यात ३ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत. पुण्यातील एस.एस.पी एम.एस महाविद्यालयाच्या मैदानावर राहुल गांधींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या सभेला महाविकास आघाडीचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. सभेपूर्वी पुण्यात महाविकास आघाडी मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहे. पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top