पालघरमध्ये पाणीकपात होणार साखरे धरणाच्या पाणीसाठ्यात घट

पालघर- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वानगाव येथील साखरे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीकपातीचा फटका बसणार आहे.

साखरे धरणाची पाणी साठवणक्षमता ४.०७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.हे धरण १९६८ मध्ये वानगाव येथे बांधले आहे.पावसाळ्याच्या चार महिन्यांत प्रचंड पाणीसाठा साठवून या धरणातून डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील बाडा पोखरण पाणीपुरवठा योजनेतील २९ गावांना, तारापूर अणुशक्ती केंद्र १ व २, तारापूर अणुशक्ती प्रकल्प ३ व ४. सी.आय.एस.एफ. वसाहत,बानगाव रेल्वे स्टेशन,आयटीआय पानगाव, तसेच मोगरवाय,केराखाडी, गाये-दाभाडी,दहिसर, कुडन,देलवडी,घिवली आदी गावांना पाणीपुरवठा होत असतो.दरम्यान,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनचे उपअभियंता गणेश गायकवाड यांनी सांगितले की,’साखरे धरणातील पाणीसाठा कमी झाला असला तरी कवडास धरणातून आतापर्यंत दोन तीन वेळा पाणी घेतले आहे. गंभीर परिस्थिती दिसली तर पुन्हा आणखी या धरणातून पाणी घेऊ.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top