पिंपरी चिंचवड महापालिकेचे 172 व्यापारी गाळे वापराविना

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहरातील 172 व्यापारी गाळे हे सध्या धूळखात पडून आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 53 गाळे हे भोसरीतील व्यापारी संकुलात आहेत. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर हे गाळे असल्याने त्याला मागणी नसल्याचे महापालिका भूमी आणि जिंदगी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लीज डीड किंवा भाडेतत्त्वावर हे गाळे वितरित झाले नसल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात 946 व्यापारी गाळे उभारले आहेत. त्यापैकी 187 गाळ्यांचा वापर महापालिकेमार्फत केला जात आहे. 392 गाळ्यांचे लीज डीड तत्त्वावर वितरण करण्यात आले आहेत. तर, दरमहा भाडेतत्त्वावर 194 गाळे देण्यात आले आहेत. तथापि, 172 गाळे रिक्त असून त्यांचे वितरण झालेले नाही. प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वानेदेखील गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचे नागरिकांच्या मागणीनुसार 5 ते 10 वर्षांसाठी लीझ डीड केले जाते. त्यासाठी एक रकमी 3 ते 10 लाख रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वाने देखील गाळ्यांचे वितरण झाले आहे. त्यासाठी गाळ्यांच्या क्षेत्रानुसार 3 ते 12 हजार रुपये इतके दरमहा भाडे घेण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top