पुण्यात कोयता गँगकडून २० वाहनांची तोडफोड

पुणे- पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरू झाली असून अप्पर बेबेवाडी परिसरात हातात कोयते घेऊन १० ते १५ जणांच्या टोळक्याने काल रात्री 15 ते 20 दुचाकी आणि एका कारची तोडफोड केली. या तोडफोडीदरम्यान या टोळक्याने वीज बंद केली होती. या घटनेमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले.
या टोळक्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपदेखील स्थानिक लोकांनी केला. पोलिसांकडून या गँगमधील मुलांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी कोयता गँगमधील अनेक आरोपींना अटक केली आहे. गेल्याच महिन्यात इंदापूरमध्ये कोयता गँगचा म्होरक्या असलेला अविनाश धनवेची कोयत्यानेच हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल झाला. या आधी पुण्याच्या गोऱ्हे बुद्रूक परिसरातदेखील कोयता गँगने मोठी दहशत पसरवली होती. कोयता गँगमधील ४ ते ५ जणांनी ३ जणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. दहशत पसरवण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आल होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top