पुण्यात भरधाव एसटीची सात वाहनांना धडक

पुणे

पुण्यातील हडपसर मार्गावरील रामटेकडी येथील फातीमानगर परिसरात काल रात्री सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जाणाऱ्या एका भरधाव एसटी बसने दोन गाड्या आणि पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले. यात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. बसमध्ये अपघाताच्या वेळी ३० प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांनतर पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतले. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top