पुण्यात शनिवारी-रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द

पुणे- पुण्यातील खडकी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी उद्या व रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवसांसाठी पुण्याहून मुंबईला धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस यासह १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या दोन दिवसात पुणे लोणावळा दरम्यानच्या ४६ लोकल गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
दोनदिवसीय ब्लॉक कालावधीत तिरुअनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस २ तास उशिराने धावेल. ग्वालियर- दौंड साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दीड तास उशिराने, दौंड -इंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ४ तास उशिराने, पुणे- जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २ तास उशिराने, पुणे- मुंबई इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिराने, तर पुणे- एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस १ तास उशिराने धावणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top