प्रभू रामांच्या चरणी सोन्याचे धनुष्यबाण अर्पण करणार

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनच्या सोहळ्यानिमित्त अयोध्येतील अमावा राम मंदिरातर्फे प्रभू रामांच्या चरणी अडीच किलो सोन्याचे धनुष्यबाण अर्पण केले जाणार आहे. १९ जानेवारीला हे धनुष्यबाण श्री रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दिले जाणार आहे.

याबाबात माहिती देताना अमावा राम मंदिराचे विश्वस्त शायन कुणाल यांनी सांगितले की, ‘अयोध्येच्या राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी हे धनुष्य प्रभू रामांच्या चरणी अर्पण केले जाईल. हे अडीच किलो सोन्याचे धनुष्यबाण चेन्नईतून आणले जाणार आहे. वाल्मिकी रामायणातील वर्णनानुसार हे धनुष्य तयार केले आहे. निरनिराळ्या बाणांचे वर्णनही त्यात दिलेले आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या चेन्नईमधील कुशल कारागिरांनी या धनुष्यबाणाची निर्मिती केली आहे. धनुष्यबाण तयार करण्यासाठी २३ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. अडीच किलो वजनाचे धनुष्यबाण तयार करण्यासाठी सुमारे ६०० ते ७०० ग्रॅम सोने वापरले आहे. हे धनुष्य तयार करण्यासाठी सुमारे २ महिन्यांचा कालावधी लागला.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top