प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे आजपासून बुकिंग सुरू

डेहराडून
देशातील भाविक आणि यात्रेकरुंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आगाऊ बुकिंग नावनोंदणी उद्यापासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने दिली आहे.
यंदाची अमरनाथ यात्रा १९ आगस्ट रोजी संपणार आहे. यावेळी जुलै महिन्यात अमरनाथ बाबांच्या आरतीचे थेट प्रक्षेपण गुहेतून होणार आहे. नोंदणीसाठी अधिकृत असलेल्या बॅंकांच्या शाखांबद्दल तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल. नोंदणीसाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत आरोग्य प्रमाणापत्रे तयार करणार्या रुग्णालये आणि डॅाक्टरांच्या पथकांची यादी जाहीर केली जाईल असे देखील मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले. अमरनाथ यात्रेकरूंसाठी ५ जी नेटवर्क आणि २४ तास वीज उपलब्ध असेल. 10 मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top