प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडीतील ओटवणे येथील प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त २३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्या समाधी मंदिरात २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी ९:३० वाजता महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ वाजता गुरुदत्त प्रसादिक भजनी मंडळ (पुणे), हभप अशोक महाराज गुरव आणि गोरक्षनाथ महाराज टाव्हरे यांचे सुश्राव्य भजन व कीर्तन होणार आहे.

त्याचबरोबर दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता पारंपारिक वारकरी हरिपाठ, सायंकाळी ५ वाजता पारंपारिक पंचपदी नामस्मरण, नामसंकीर्तन, दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी रात्री ८ वाजता ओटवणे कापईवाडी येधीत श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ ओटवणे कापईवाडी यांचे सुश्राव्य भजन होणार असून संगीत साथ अक्षय काटाळे (हार्मोनियम), वरद केळुसकर (तबला), अजय केळुसकर आणि तुषार नाईक (मृदंग) यांची आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top