फक्त गुजरामधील पांढऱ्या कांद्याला निर्यातीच्या मंजुरीने महाराष्ट्रात संताप

नवी दिल्ली- केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादल्याने शेतकरी वर्गात केंद्र सरकारविरुद्धात नाराजी आहे.त्यातच आता केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने खास परिपत्रक काढून फक्त गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत.
केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून देशात कांदा निर्यात बंदी लागू केली आहे. ही निर्यात बंदी हटवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र त्याला अद्याप परवानगी न देता सरकारने फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्याबाबत निर्णय घेतला आहे.या कांद्याची निर्यात मुंद्रा पोर्ट,पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा म्हणजे जेएनपीटी पोर्टवरून केली जाणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रकातून दिली आहे. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची २००० मेट्रिक टन निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे याबाबत म्हणाले की, एकीकडे लाल आणि उन्हाळ कांदा कवडीमोल भावाने विकला जातोय. तर दुसरीकडे कांदा निर्यात खुली करण्याच्या बाबतीत केंद्र सरकार अजूनही उदासिन आहे. मात्र, सरकारने अचानक गुजरातमधील पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. हा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर अन्याय असून हे धोरण शेतकर्यांना मातीत घेऊन जाणारे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top