फडणवीसांना धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर अटक

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. किंचक नवले असे आरोपीचे नाव आहे. याप्रकणी आरोपी किंचकला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांताक्रुझ पोलिसांनी आरोपी किंचकला सातारा येथील सदर बाझार येथे अटक केली. फडणवीस धमकी प्रकरणात ही दुसरी अटक आहे.
आरोपी किंचकने फडणवीसांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. आरोपीचा हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अक्षय पनवेलकर यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी योगेश सावंत आणि किंचक नवले या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. यांनतर पोलिसांनी नवी मुंबईतून योगेश सावंत यांना अटक केली असून त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचकला अटक केली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top