बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली- केंद्र सरकारने काल १० लाख ३४ हजार ८०० टन बिगर बासमती पांढरा तांदूळ नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह ७ देशांना निर्यात करण्यास मंजुरी दिली. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) मार्फत ही परवानगी देण्यात आली आहे, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचनेत म्हटले आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी २० जुलै रोजी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली असली तरी, सरकारने काही देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विनंतीनुसार निर्यातीला परवानगी दिली जाते.
बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात नेपाळ, कॅमेरून, कोटे डी’ आयव्होर, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशल्सला करण्यास मंजुरी असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. नेपाळसाठी सूचित केलेले प्रमाण ९५ हजार टन, कॅमेरून १ लाख ९० हजार टन, कोटे डी’ इव्होर १ लाख ४२ हजार टन, गिनी १ लाख ४२ हजार टन, मलेशिया १ लाख ७९ हजार टन, फिलीपाइन्स २ लाख ९ हजार टन आणि सेशल्सला ८०० टन निर्यात करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top