मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा- ठाणे अप-डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत ब्लॉककाळात सीएसएमटी- कल्याण अप आणि डाऊन धीम्या लोकल माटुंगा- ठाण्यादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत सीएसएमटी- पनवेल/ बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल- ठाणे अप लोकल सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे- पनवेल डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top