महाबळेश्वरमध्ये पर्यटकासह घोडा खोल दरीत कोसळला

महाबळेश्वर- सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या निसर्गसंपन्न महाबळेश्वरमध्ये पर्यटकासह एक घोडा ३० फुट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत घोडा आणि पर्यटक दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी घोड्याची सैर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.याठिकाणी लॉडवीक पाँईंटवर घोड्यावरून सैर करण्यासाठी पुणे येथून युवकांचा एक ग्रुप आला होता.त्यातील एक पर्यटक सैर करण्यासाठी घोड्यावर बसला.मात्र काही अंतरावर गेल्यानंतर घोडा उधळला. त्याचा वेग अचानक वाढला आणि वेगात हा घोडा दरीच्या टोकावर गेला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरला आणि घोडा दरीत कोसळला.या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पर्यटक आणि घोडा या दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, २०१८ साली एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने घोड्यांवर बंदी घालण्यात आली होती. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदीमुळे स्थानिक नेते मात्र आक्रमक झाले होते. त्यानंतर घोडे सवारी पुन्हा सुरू करण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top