मुंबईतील अनधिकृत बॅनर छापून देणार्‍यांना पालिका नोटिसा धाडणार

मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे यावेळी एक वेगळी कारवाई मोहीम राबविली जाणार आहे.अनधिकृत बॅनर हटविताना हे अनधिकृत फलक,बॅनर छपाई करून देणाऱ्या प्रिंटिंग व्यावसायिकांनाही पालिका नोटिसा बजावणार आहे.तसे सक्त आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत पालिकेच्या मुख्यालयात नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली आहे.त्यावेळी
अनधिकृत फलक, बॅनर छपाई करून देणाऱ्या प्रिंटिंग व्यावसायिकांनाही नोटिसा बजावणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालिका हद्दीतील अनधिकृत फलक,बॅनर्स, बेवारस वाहने,पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश डॉ.अश्विनी जोशी यांनी दिले.या बैठकीला उपायुक्त संजोग कबरे, सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह अनुज्ञापन विभागाचे आणि इतर सर्व संबंधित विभागांतील अधिकारी उपस्थित होते. पालिकेने सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. शहर अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.पण त्यात रस्ते दुभाजकांमध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांमुळे सुशोभीकरणात बाधा येत आहे.कोणतीही परवानगी न घेता फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे यापुढे असे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top