‘मुंब्य्रातील चांदनगरात गॅस सिलेंडरचा स्फोट

ठाणे- मुंब्रातील चांदनगर परिसरात आज सकाळी सहा वाजता गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तिथे पोहोचले. त्यानंतर काही काळाने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घटनास्थळी पीकअप वाहनासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, फायर वाहनासह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
मुघल पार्क या इमारतीच्या ए विंगमध्ये राहणाऱ्या मनीषा मोर्वेकर यांच्या घरात गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले. या शिवाय एक रिक्षा आणि एका चारचाकी वाहनाचे देखील नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top