वांगचूक यांनी सीमेवरील मोर्चा स्थगित केला

लडाख – लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी चीन सीमेवर धडक देण्यासाठी आज आयोजित केलेला मोर्चा अचानक स्थगित केला. वांगचूक यांची कोंडी करण्यासाठी सरकारने लडाखमध्ये कलम १४४ लागू करून जमावबंदी केली. त्यावर तिखट प्रतिक्रिया देत वांगचूक यांनी आपला मोर्चा स्थगित केला. लडाखमधील गुराख्यांच्या चराऊ कुरणांच्या हजारो एकर जमिनीवर देशातील धनिकांनी आणि चीनने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे, असा वांगचूक यांचा आरोप आहे. या जमिनींची माहिती जमा करण्यासाठी वांगचूक थेट चीन सीमेपर्यंत धडक देणार होते. मात्र सरकारची ‘अतितत्परता आणि कार्यक्षमता ‘ पाहून आपण मोर्चा स्थगित करीत आहोत, असे वांगचूक यांनी जाहीर केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top