विधानसभेत प्रणिती शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात जुगलबंदी

नागपूर- विधानसभेत आज आरोग्य खात्यावरून सुरू असलेल्या चर्चेत आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात खडाजंगी झाली. सोलापूर जिल्हा रूग्णालयातील औषधांच्या तुटवड्याबाबत प्रणिती शिंदेंनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना औषधांच्या तुटवड्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्याला कधीही पत्र दिले नसल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी पत्र दिले तरच काम करायचे नसते. जनतेचे प्रश्न सोडवणे सरकारचे काम आहे. सरकारचे नाही तर लोकप्रतिनिधींचे देखील काम आहे. जनेतची काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘आरोग्य शिबिरामध्ये लोह, मधुमेहाच्या गोळ्या जबरदस्ती दिल्या जातात. ज्यामुळे सिव्हिल रूग्णालयात गर्भवती महिलांसाठी तुटवडा होतो. सिव्हिल रूग्णालयात सीटी स्कॅनच्या मशिन्स बंद आहेत, त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले.’ यावर स्पष्टीकरण देत तानाजी सावंत यांनी सांगितले की, सिव्हिल रूग्णालयाचा प्रश्न वैद्यकीय शिक्षणाचा आहे. औषधांच्या तुटवड्याच्या प्रश्नाविषयी मला कधी पत्रच दिले नाही. पत्राशिवाय मी कशी कारवाई करणार? मला पत्र द्या तर मी तातडीने कारवाई करेल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील ३१ शासकीय रक्तकेंद्रामध्ये येत्या एका महिन्यात अँलिकाँट मशीन बसवण्यात येतील. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तिथेही मशीन एक महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय खाजगी रक्तपेढ्यांनाही यासंबंधित सूचना देण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top