Home / News / शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र सुरू

शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र सुरू

मुंबई – शेअर बाजार आज पुन्हा घसरणीसह बंद झाला.बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरून बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – शेअर बाजार आज पुन्हा घसरणीसह बंद झाला.बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरून बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ८१,२८९ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८३ अंकांच्या घसरणीसह २४,५४८ अंकांवर बंद झाला.
बँक निफ्टी १७४ अंकांनी घसरून ५३,२१६ अंकांवर बंद झाला.बाजार बंद होताना निफ्टीच्या ५० शेअरपैकी १४ शेअर वधारले तर ३५ शेअर घसरले. तर एक शेअर कोणताही बदल न होता व्यवहार करत होता. अमेरिकेत दर कपातीच्या अपेक्षेमुळे आज आयटी कंपन्यांचे शेअर वधारले.

Web Title:
संबंधित बातम्या