संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ५ ते १२ डिसेंबर वाहतुकीत बदल

पिंपरी – श्री क्षेत्र आळंदी येथे 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. यानिमित्त अलंकापुरीत लाखो वारकरी, भाविक येण्याची शक्यता आहे. आळंदी येथे आलेलेल वारकरी देहूगाव आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जात असतात. त्या पार्श्वभूमीवर दिघी-आळंदी, देहूरोड, तळवडे, चाकण वाहतूक विभागातील वाहतूक वळविण्यात आली आहे.
5 ते 12 डिसेंबर या कालावधीतील पुढील मार्ग बंद राहतील आणि या मार्गांसाठी पर्यायी वाहतूक मार्ग देण्यात आले आहेत –
१) मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद, २)भारतमाता चौक, मोशी येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ३) चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ४) आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ५) चाकण-वडगाव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
६) मरकळ मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ७) पुणे-दिघी मॅगझीन चौक मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ८) तळेगाव चाकण रोडवरील देहू फाटा येथून देहूगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहतूक बंद ९) देहू कमान ते 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top