साकीब नाचन इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या

नवी दिल्ली – इसिसच्या मॉड्युलं चालवत होता दरम्यान तो परदेशातील काही हँडलर्सच्या संपर्कात होता.त्याने अनेक तरुणांना आपल्या संघटनेत सामील करून घेतले होते, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए)च्या तपासातून उघड झाली आहे.
एनआयएने दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील पडघा इथल्या बोरिवली गावात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर साकीब नाचनसह १५ जणांची धरपकड केली होती. त्यांना दिल्लीतील पटियाला कोर्टात हजर करण्यात आले होते या कोर्टात या सर्वांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएकडून त्यांची चौकशी सुरू असून या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे.
साकीब नाचन इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या असल्याची आणि तो परदेशातील तीन हँडलर्सच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याने या संघटनेत शपथ देऊन अनेक तरुणांना सामील करून घेतले होते. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉशही केला जात होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top