Home / News / सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत१२ तास पाणीपुरवठा बंद

सोमवारी अंधेरी, जोगेश्वरीत१२ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई – महापालिकेच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात येत्या सोमवार २ सप्टेंबर रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – महापालिकेच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात येत्या सोमवार २ सप्टेंबर रोजी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.वेरावली जलाशय येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागातर्फे वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवार २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.या १२ तासांच्या कालावधीत म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच के पूर्व विभागातील काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
त्यामुळे अंधेरी,जोगेश्वरी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या