रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील.

कुर्ला ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top