हनुमान चालीसा पठण करून नवनीत राणांचे मतदान

अमरावती – मतदानाच्या दिवशी सर्वात आधी मी हनुमान चालीसाचे पठण केले. यानंतर आईचे व घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेतला असे आज मतदानाला निघताना नवनीत राणा यांनी सांगितले. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम ठेवल्यापासून नवनीत राणा प्रकाशझोतात आहेत . लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्पातील मतदान आज अमरावतीत पार पडले. मतदानाचा हक्क बाजवण्याआधी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीची लढाई लढत आहे . अमरावतीच्या जनतेच्या प्रत्येक डोळ्यामध्ये आज ‘खिलता हुआ कमल’ दिसत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top