Home / News / Hafiz Saeed Named in Supplementary Chargesheet in Pahalgam Terror Attack Case : पहलगाम हल्ला पुरवणी आरोपपत्रात लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिजचे नाव

Hafiz Saeed Named in Supplementary Chargesheet in Pahalgam Terror Attack Case : पहलगाम हल्ला पुरवणी आरोपपत्रात लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिजचे नाव

Hafiz Saeed Named in Supplementary Chargesheet in Pahalgam Terror Attack Case : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात आज एनआयएने (राष्ट्रीय तपास...

By: Team Navakal
Hafiz Saeed Named in Supplementary Chargesheet in Pahalgam Terror Attack Case
Social + WhatsApp CTA


Hafiz Saeed Named in Supplementary Chargesheet in Pahalgam Terror Attack Case : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात आज एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकासह एकूण २६ जणांचा मृत्यू झाला होता.

हे पुरवणीआरोपपत्र जम्मू येथील एनआयए विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये हाफिज सईदचे नाव वैयक्तिक आरोपी म्हणून तसेच बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि त्याची छुपी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा संस्थापक व प्रमुख म्हणून नमूद करण्यात आले आहे. एनआयएच्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता बीएनएस, २०२३ तसेच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा यूएपीए, १९६७ अंतर्गत विविध कलमांनुसार हाफिज सईदवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

भारताविरुद्ध युद्ध छेडणे आणि सीमेपलीकडून कट रचून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहेत. मूळ १,५९७ पानी आरोपपत्राच्या पुढील भाग म्हणून दाखल करण्यात आलेल्या या पुरवणी आरोपपत्रात पाकिस्तानची या हल्ल्यातील कथित भूमिका, हाफिज सईदचा सहभाग तसेच वैज्ञानिक तपास आणि प्रत्यक्ष चौकशीतून गोळा करण्यात आलेले पुरावे नमूद करण्यात आले आहेत.

२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्माच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक रहिवाशाचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडच्या काळातील हा सर्वाधिक भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतरकेंद्रीय गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविला.

१५ डिसेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात एनआयएने पाकिस्तानातील साजिद जट्ट, जुलै २०२५ मध्ये ऑपरेशन महादेवदरम्यान ठार करण्यात आलेले तीन दहशतवादी आणि अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे समाविष्ट केली होती. तसेच हल्ल्याचे नियोजन, मदत आणि अंमलबजावणीत सहभाग असल्याच्या आरोपाखाली लष्कर-ए- तोयबा या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेलाही आरोपी करण्यात आले होते. एनआयएने स्पष्ट केले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सीमेपलीकडील व्यापक कटाचा उलगडा करण्यासाठी आणि हल्ल्याचे नियोजन व मदत करणाऱ्या सर्व संबंधितांचा शोध सुरूच राहणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या