Ram Temple Administration Handed Over to District Magistrate – अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता मंदिराच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले आहेत. अयोध्येचे जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी मंदिर व्यवस्थापनाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पूर्ण केली आहे. मात्र हे प्रकरण कोट्यवधी भाविकांच्या श्रध्देशी संबंधित असल्याने एसआयटीने आपला प्राथमिक अहवाल आज राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. अंतिम अहवाल 15 दिवसांनी सादर करण्यात येणार आहे.
एसआयटीने चौकशी सुरू केल्यापासून मंदिरात काम करणार्या 1,600 कर्मचार्यांवरील पाळत वाढवण्यात आली आहे. याआधी दानपेटीत येणार्या देणगीच्या नोटांची मोजणी सेवादार टेबल-खुर्चीवर बसून करत होते. मात्र आता जमिनीवर चटई आणि गालिचा अंथरून नोटा मोजल्या जातात. येता-जाता कर्मचार्यांची कसून तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर दानपेटीतून पैसे काढताना व्हिडिओ चित्रण केले जात आहे.
मंदिरात काम करणार्या 40 विश्वासू सेवादारांनाच नोटा मोजण्याचे काम दिले जात आहे. जुने कर्मचारी आणि नोटा मोजण्यासाठी येणार्या बँकेच्या दोन कर्मचार्यांनाही हटवून नवीन लोकांना नियुक्त करण्यात आले आहे. सहा नवीन सीसीटीव्हीदेखील बसवण्यात आले आहेत.
राम मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय, सदस्य डॉ. अनिल मिश्रा आणि आमंत्रित सदस्य गोपाल राव यांचे अधिकार गोठवण्यात आले आहेत. ते आता मंदिराच्या दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत. मंदिराच्या व्यवस्थेशी संबंधित कोणतेही निर्णय ते घेऊ शकत नाहीत.शशांक त्रिपाठी हे न्यासाचे पदसिद्ध सदस्य आहेत. तेच आता मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहेत.
एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास तीन भागांमध्ये विभागला आहे. ज्यामुळे भविष्यात देणग्या आणि मंदिराच्या मालमत्तेत अपहार होऊ नये. न्यासाच्या प्रमुख पदाधिकार्यांमध्ये चंपत राय, डॉ.अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांना एसआयटीच्या अहवालात क्लीनचिट मिळणे
कठीण आहे.
खिसे नसलेले गणवेश
राम मंदिरातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता दानाची मोजणी करणार्या बँक कर्मचार्यांसाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. या कर्मचार्यांना आता खिसे नसलेला गणवेश परिधान करावा लागणार आहे. जेणेकरून चोरीची अजिबात शक्यता राहू नये.










