Home / महाराष्ट्र / PMPML E-Bus Breakdowns: पुणेकरांचा प्रवास रामभरोसे! पीएमपीएमएलच्या ‘या’ बसेस भररस्त्यात वारंवार होतायत बंद; 5 महिन्यांत दुपटीने वाढला बिघाड

PMPML E-Bus Breakdowns: पुणेकरांचा प्रवास रामभरोसे! पीएमपीएमएलच्या ‘या’ बसेस भररस्त्यात वारंवार होतायत बंद; 5 महिन्यांत दुपटीने वाढला बिघाड

PMPML E-Bus Breakdowns: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनासमोर कंत्राटदारांच्या बसेसने मोठे संकट उभे केले...

By: Team Navakal
PMPML E-Bus Breakdowns: पुणेकरांचा प्रवास रामभरोसे! पीएमपीएमएलच्या 'या' बसेस भररस्त्यात वारंवार होतायत बंद; 5 महिन्यांत दुपटीने वाढला बिघाड
Social + WhatsApp CTA

PMPML E-Bus Breakdowns: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनासमोर कंत्राटदारांच्या बसेसने मोठे संकट उभे केले आहे. खासगी कंत्राटदारांमार्फत चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) रस्त्यातच नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये गेल्या 5 महिन्यांत कमालीची वाढ झाली आहे.

वारंवार होणाऱ्या बैठका, सूचना आणि दंडात्मक कारवाईनंतरही या परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या पुणेकरांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जानेवारी ते मे २०२६ या ५ महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी पाहिल्यास कंत्राटदारांच्या बसेसमधील निष्काळजीपणा उघड होतो. पीएमपीएमएलच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस जानेवारीमध्ये 370 वेळा, तर मे महिन्यात 412 वेळा नादुरुस्त झाल्या.

याउलट, कंत्राटदारांच्या बसेस जानेवारीत 950 वेळा, तर मे महिन्यात थेट 2016 वेळा भररस्त्यात बंद पडल्या. म्हणजेच कंत्राटदारांच्या बसेसमधील बिघाडाचे प्रमाण ५ महिन्यांत दुपटीने वाढले आहे. मे महिन्यात झालेल्या एकूण 2428 ब्रेकडाऊनपैकी तब्बल 2016 घटना या केवळ कंत्राटदारांच्या बसेसच्या होत्या.

बसेसच्या ब्रेकडाऊनची मुख्य कारणे आणि प्रवाशांचे हाल:

दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रशासनाच्या तपासणीत या बिघाडांमागे खालील प्रमुख कारणे समोर आली आहेत:

  • बॅटरीची घटलेली क्षमता: बहुतांश ई-बसेसच्या बॅटरीची कार्यक्षमता पूर्णपणे खालावली आहे, ज्यामुळे बसेस मध्येच बंद पडत आहेत.
  • वेळेवर देखभालीचा अभाव: कंत्राटदारांकडून वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग केली जात नाही. किलोमीटरनुसार मोठा मोबदला मिळूनही गाड्यांच्या देखभालीवर पुरेसा खर्च केला जात नसल्याचे चित्र आहे.
  • प्रवाशांचे हाल आणि वाहतूक कोंडी: ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत आहे.

दुसरीकडे, नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, तिकीट दर वाढवूनही सेवा मात्र अतिशय निकृष्ट दर्जाची मिळत आहे. दररोज घराबाहेर पडताना बस वेळेत पोहोचेल की नाही, याची धास्ती प्रवाशांना लागलेली असते. त्यामुळे केवळ कागदावर बैठका न घेता कंत्राटदारांवर थेट कडक कारवाई करून बसेसची गुणवत्ता सुधारावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
संबंधित बातम्या